आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Praveenkumar Want To Comeback In Indian Cricket Team

प्रवीणकुमारला करायचे आहे टीम इंडियामध्‍ये पुनरागमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गेल्‍या एक वर्षांहून अधिक काळ टीम इंडियाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज प्रवीणकुमार पुनरागमनाची वाट पाहतोय. त्‍याने आता 2013-14 च्‍या प्रथमश्रेणीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

मी टेनिस एल्‍बोच्‍या दुखण्‍यातून पूर्णपणे सावरला असून सध्‍या चांगली गोलंदाजीही करीत आहे. आता घरगुती क्रिकेटमध्‍ये चांगले प्रदर्शन करून टीम इंडियामध्‍ये परतायचे आहे, असे प्रवीणकुमारने आज (मंगळवारी) म्‍हटले.

प्रवीणने आपला शेवटचा आंतरराष्‍ट्रीय सामना 2012च्‍या अशिया चषकात खेळला होता. यावर्षी आयपीएलमध्‍येही त्‍याने सहभाग नोंदवला होता. मात्र, खराब फॉर्ममुळे त्‍याला आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट खेळण्‍याची संधी मिळाली नव्‍हती. चॅम्पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये टीम इंडियाच्‍या विजयाचे यावेळी त्‍याने कौतुक केले.