आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियम धाब्यावर बसवून केली 8 अविवाहित महिला बॉक्सरची प्रेगनंसी टेस्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक

नवी दिल्ली - भारतीय बॉक्सिंगमध्ये पुन्हा एकदा एक नवा वाद समोर आला आहे. यावेळी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये खेळण्यासाठी जाणा-या महिला बॉक्सरची प्रेगनंसी टेस्ट केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बॉक्सिंग इंडियाने पुढल्या आठवड्यात कोरियाच्या जीजू येथे होणा-या जागतिक बॉक्सिंग चॅपियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी जाणा-या आठ अविवाहित महिलांची प्रेगनंसी टेस्ट केली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सल्लागार डॉक्टर पीएसएम चंद्रम यांनी हा खुलासा केला आहे. याआधी भारतीय बॉक्सिंग संघटनेवर इंचियोनमध्ये सरिता देवीवर झालेल्या अन्यायात तिला साथ न दिल्याचा आरोप लागला होता.

एका हिंदी वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, चंद्रम यांनी ही टेस्ट म्हणजे खेळाडुंच्या मानवाधिकारांची पायमल्ली असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते कोणत्याही अविवाहित महिलेचे प्रेगनंसी टेस्ट करणे हा गुन्हा आहे. पुढील आठवड्यात दक्षिण कोरियामध्ये 13 नोव्हेंबरपासून सुरू होणा-या या स्पर्धेसाठी 10 महिला बॉक्सरची निव़ड झाली आहे. त्यापैकी आठ बॉक्सर्सची टेस्ट दिल्लीत एका खासगी लॅबमध्ये करण्यात आली. नियमांनुसार महिला बॉक्सरला स्पर्धेपूर्वी स्वतः लेखी स्वरुपात आपण गर्भवती नसल्याचे सांगावे लागते. गर्भवती असल्यास त्यांना स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी नसते. पण त्यासाठी प्रेगनंसी टेस्ट करायला हवी असा नियमात उल्लेख करण्यात आलेला नाही.