आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pregnant Alysia Montano Runs In 800m Race At US Championships

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठ महिन्यांच्या गरोदर अॅथलिटने अडीच मिनिटांत पार केले 800 मीटर अंतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- अमेरिकेची अॅथलिट अॅलिसिया मोन्टानो हिने प्रेग्नेंसीच्या काळात यूएस अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नोंदवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अॅलिसिया मोन्टानो ही आठ महिन्यांची गरोदर आहे. विशेष म्हणजे तिची ड्यु डेट अवघ्या चार आठवड्यांवर आली आहे. अॅलिसियाने शर्यतील 2 मिनिट 32 सेकंदात 800 मीटर अंतर कापले. तरी देखील तिला या शर्यतीत पराभवाचा सामना करावा लागला.
अॅलिसिया पाच वेळा यूएस आउटडोर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप विजेता ठरली आहे. अॅलिसिया हिने गरोदर काळातही स्वत:ला फिट ठेवले आहे. कमी वेळात ही शर्यत मला जिंकायची होती. मात्र, तिला विजयापर्यंत पोहोचता आले नाही. आपण पूर्ण प्रयत्न केल्याचे अॅलिसियाने सांगितले.
कोण आहे मोन्टानो?
अॅलिसिया मोन्टानो ही अमेरिकेची मिडल डिस्टेंस रनर आहे. यूएस आउटडोर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे. सगळ्यात आधी 2007 मध्ये तिने चॅम्पियनशिप जिंकली होती. नंतर 2010, 2011, 2012 आणि 2013 मध्ये मोन्टानो हिच ‍विजेता ठरली.

केसांत फूल ओवून शर्यतीत धावते अॅलिसिया...
2012 मध्ये लंडन ओलिम्पिकमध्ये अमेरिकन संघाकडून अॅलिसियाने सहभाग घेतला होता. मोन्टानोचे वैशिष्ट्य सांगायचे तर ती केसांमध्ये फूल ओवून शर्यतीत धावते. लंडन ओलिम्पिकमध्ये 800 मीटरच्या शर्यतीत ती पाचव्या स्थानावर राहिली होती.

2010 मध्ये दोहामधील वर्ल्ड इंडोर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अॅलिसियाने 800 मीटरच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावले होते.

पुढील स्लाइटवर क्लिक करून पाहा, प्रेग्नेंट मोन्टानोचा यूएस चॅम्पियनशिप्समधील जलवा...