पुणे - किंग्ज इलेव्हन पंजाबची को-ऑनर आणि ब़ॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा
आपल्या टीमला चीयर करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. प्रितीने मॅच दरम्यान फॅन्सला पंजाबची जर्सी भेट दिली त्यासोबतच फ्लाइंग किस देखील दिला. फॅन्सनी देखील तिला निराश केले नाही. कालच्या सामन्यात मैदानावर प्रितीचीच छाप होती. जेव्हा कॅमेरा प्रितीवर येत होता तेव्हा प्रेक्षागृहातून तिचेच नाव उच्चारले जात होते. पंजाब टीमला चीयर करण्यासाठी प्रितीसह अभिनेता दिलीप ताहिल देखील मैदानात उपस्थित होता.
मॅचचा रोमांच ; 26 रन्सने पंजाब पराभूत
अष्टपैलू जेम्स फॉकनरने केलेली 46 धावांची अफलातून खेळी आणि 3 बळींच्या भरवशावर राजस्थाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर "रॉयल' विजयाची नोंद केली. आयपीएलच्या यंदाच्या सत्रातील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला 26 धावांनी धूळ चारली.
पुढील स्लाइडमध्ये, प्रितीने दिला चाहत्यांना फ्लाइंग किस, नेस वाडियाही होता मैदानात