आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Premier League: Liverpool Hold Off A Spirited Swansea Comeback News In Marathi

लिव्हरपूल, नॉर्विच सिटीची आगेकूच; स्वानसाचा पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिव्हरपूल - यजमान लिव्हरपूल, नॉर्विच सिटी आणि न्यूकॅसल युनायटेड टीमने इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये शानदार विजयाची नोंद केली. दुसरीकडे अँस्टोन व्हिला, टोटेनहॅमला पराभवाचा सामना करावा लागला. व्हिलाला ईपीएलमध्ये 13 व्या पराभवाला सामोरे जावे लागले.

हेंडरसन (20,74 मि.) आणि स्टुरिडगे (3, 36 मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल करून लिव्हरपूलला इंग्लिश फुटबॉल प्रीमियर लीगमध्ये शानदार विजय मिळवून दिला. जबरदस्त फॉॅर्मात असलेल्या या टीमने लढतीत स्वानसा सिटीचा 4-3 अशा फरकाने पराभव केला. या विजयाच्या बळावर लिव्हरपूलने 59 गुणांसह गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी धडक मारली. अवघ्या एका गुणांच्या आघाडी चेल्सी (60 गुण) अव्वल स्थानावर आहे. स्वानसाकडून शेल्वी (23 मि.), बोनीने (27, 47 मि.) केलेली खेळी व्यर्थ ठरली.

स्टुरिडगेने घरच्या मैदानावर तिसर्‍याच मिनिटाला गोलचे खाते उघडून यजमानांना 1-0 ने आघाडी मिळवून दिली. त्याने पहिला मैदानी गोल केला. हेंडरसनने यजमानांच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले.स्वानसा सिटीकडून शेल्वीने 23 व्या मिनिटाला पहिला गोल केला होता.

न्यूकॅसल, नॉर्विच सिटी विजयी
दुसरीकडे न्यूकॅसल युनायटेडने रंगतदार लढतीत अँस्टोन व्हिलावर मात केली. या टीमने लढतीत 1-0 ने सामना जिंकला. रेमीने शेवटच्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय निश्चित केला. तसेच नॉर्विच सिटीने टोटेनहॅमाला 1-0 ने हरवले स्नोडग्रासने 47 व्या मिनिटाला गोल करून संघाला विजय मिळवून दिला.