आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President And Pm At Cover Page Of Bcci's Annual Report, News In Marathi

क्रिकेटपटू सोडून BCCI च्‍या वार्षिक अहवालावर झळकले पंतप्रधान-राष्‍ट्रपती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - बीसीसीआयच्‍या वार्षिक अहवालाच्‍या कव्‍हर पेजवर राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी)
मुंबई- कसोटीमध्‍ये अचानक निवृत्‍ती घेवून धोनीने सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला असताना आता बीसीसीआयने धक्‍का दिला आहे. बीसीसीआयने वार्षिक अहवालावर क्रिकेटपटूचे फोटो न छापता राजकीय व्‍यक्‍तींचे फोटो छापले आहेत.
वार्षिक अहवालाच्‍या कव्‍हर पेजवर सचिन तेंडुलकर राष्‍ट्रपती कडून ‘भारतरत्‍न’ पुरस्‍कार स्विकारताना दाखविले आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा शपथ घेतानाचा फोटो छापला आहे. आतापर्यंतच्‍या कार्यकाळात अहवालावर राजकीय व्‍यक्‍तींचे छायाचित्र छापल्‍या गेले नव्‍हते. 86 वर्षांच्‍या क्रिकेटच्‍या इतिहासात अशी प्रथमच घटना घडली आहे.
'आम्‍हाला गर्व वाटतो, बोर्डाचे अधिकारी एवढ्या मोठ्या पदी विराजमान झाले’
बोर्डाच्‍या वार्षिक अहवालात संज पटेल यांनी लिहिले की, "बोर्डाचे माजी उपाध्‍यक्ष आणि डीडीसीएचे माजी अध्‍यक्ष सरकारमध्‍ये महत्‍वाच्‍या पदी विराजमान झाल्‍याने आम्‍हाला गर्व वाटतो. मोदी पूर्वी गुजरात क्रिकेट नियामक मंडळाचे अध्‍यक्ष होते. बोर्डचे प्रशासक अरुण जेटली यांना संरक्षण आणि वित्‍तमंत्रीपद लाभले आहे.

अहवाल आणि बॅलेंस शीटवर नाही सही
आश्‍चर्यकारक बाब ही आहे की, बीसीसीआयच्‍या 2013-14 च्‍या बॅलेंस शीटवर बीसीसीआयच्‍या मुख्‍य अधिका-यांची सही नाही.
पुढील स्‍लाइडवर पाहा, बीसीसीआयच्‍या अहवालाचे कव्‍हर पेज..