आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Award Distribute At Delhi, Heena Siddhu

हिना सिद्धूचा अर्जुन पुरस्काराने गौरव; राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज हिना सिद्धू, टिंटु लुकाचा अर्जुन पुरस्कार देऊन शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी क्रीडाविश्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांना पाच लाख व स्मृतीचिन्ह देण्यात आले. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज आर.अश्विन सध्या इंग्लंडमध्ये वनडे मालिका खेळत आहे. त्यामुळे तो या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही.

ममताला अर्जुन पुरस्कार : युवा कबड्डीपटू ममता पुजारीला अर्जुन पुरस्कार मिळाला. तसेच कुस्तीचे प्रशिक्षक महावीर प्रसाद आणि अॅथलेटिकचे कोच एन. लिंगप्पा यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला.

14 अर्जुन पुरस्कार विजेते
05 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य
03 खेळाडू ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी
अर्जुन पुरस्कार विजेते : अखिलेश वर्मा (तिरंदाजी), टिंटू लुका (अॅथलेटिक), गिरीशा (पॅरालिम्पिक), व्ही. दिजू (बॅडमिंटन), आर. अश्विन (क्रिकेट), अनिर्बन लाहिडी (गोल्फ), ममता पुजारी (कबड्डी), साजी थॉमस (रोइंग),हिना सिद्धू (नेमबाजी), अंका अलकामोनी (स्क्वॅश), टॉम जोसेफ (व्हॉलीबॉल), रेनुबाला चानू (वेटलिफ्टिंग), सुनील राणा (कुस्ती), जय भगवान (बॉक्सर).

गुरमिल सिंगला ध्यानचंद पुरस्कार
भारतीय संघाच्या गुरमिल सिंगला मेजर ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच टेनिसपटू झिशान अली आणि जलतरणपटू के. पी. ठक्करही या पुरस्काराचे मानकरी ठरले.
राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार : १ ओएनजीसी

द्रोणाचार्य पुरस्कार : महावीर प्रसाद (कुस्ती), लिंगप्पा (अॅथलेटिक-आजीवन), जी. मनोहरन (बॉक्सिंग-आजीवन), गुरचरणसिंग गोगी (ज्युदो-आजीवन), जोस जेकोब (रोइंग-आजीवन).

ध्यानचंद पुरस्कार : गुरमिल सिंग (कॉकी), के. पी.ठक्कर (जलतरण), झिशान अली (टेनिस).