आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preview : CSK Vs DD In IPL 8, Know Key Players Of This Match

CSK v/s DD: धोनीला विसरावे लागतीत जूने वाद, युवीवर 16 कोटींच्या परतफेडीची जबाबदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - आयपीएलच्या आठव्या सीजनमध्ये आज (गुरुवार) चेन्नई सुपर किंग्जचा सामना दिल्ली डेअर डेव्हील्ससोबत होणार आहे. आयपीएलच्या सगळ्यात तगड्या टीमपैकी चेन्नई एक आहे. ही टीम 2010 आणि 2011 मध्ये चॅम्पियन राहिली आहे. तर, 2008, 2012 आणि 2013 मध्ये उपविजेती राहिली आहे. तर, दिल्ली आयपीएलमधील सर्वात कमकुवत संघ राहिला आहे. दिल्लीने फक्त 2009 आणि 2012 मध्ये चांगले प्रदर्शन केले होते. तेव्हाही ते फक्त तिसर्‍या क्रमांकापर्यंत पोहोचले होते.
दिल्ली नव्या उमेदीने खेळण्याच्या तयारीत
स्फोटक फलंदाज वीरेद्र सहेवागच्या नेतृत्त्वात दिल्लीला यश मिळाले नाही, त्यानंतर जे.पी.ड्यूमिनीकडे नेतृत्व सोपवण्यात आले. आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू युवराजसिंहवर आता दिल्लीला यशोशिखरावर नेण्याची जबाबदारी राहाणार आहे. दिल्लीने 16 कोटी रुपये मोजून युवराजला खरेदी केले आहे. ड्युमिनीवर रणनीती तयार करुन खेळाडूंकडून चांगली कामगिरी करुन घेण्याची जबाबदारी राहाणार आहे.
धोनीला विसरावे लागेल जुने वाद
महेंद्रसिंह धोनीला जूने वाद विसरून आयपीएलमध्ये खेळावे लागणार आहे. टीम प्रिंसिपल गुरुनाथ मयप्पन स्पॉट फिक्सिंग अडकले असल्याचे समोर आल्यानंतर कर्णधार धोनीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. धोनी याबद्दल कधीच काही बोलला नसला आणि त्यापासून स्वतःला दूर ठेवले तरी त्याच्यावर मोठा दबाव असणार हे नक्की. त्यामुळे त्याला या सीजनमध्ये नवी सुरुवात करावी लागणार आहे.
चेन्नईची मजबूत बाजू
{सुपरकिंग्जचे प्रदर्शन आणि रणनीतीच्या हिशेबाने या संघात मोठा बदल दिसणार नाही. कर्णधार म्हणून धोनी आणि कोच म्हणून स्टीफन फ्लेमिंग यांची जोडी चेन्नईला पुन्हा धमाक्यात मैदानावर कामगिरी करण्यास प्रेरित करू शकते. चेन्नईची टीम अशाच खेळासाठी ओळखली जाते.
{ चेन्नईकडून न्यूझीलंडचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्लुम आहे. डेवेन स्मिथसारख्या उत्तम खेळाडूंसह सुरेश रैना, माइक हसी, धोनी, डेवेन ब्राव्हो मधल्या फळीचे आधारस्तंभ असतील.
{ जे. पी. डुमिनीच्या नेतृत्वात आयपीएल-८ मध्ये धमाकेदार कामगिरी करण्याचे दिल्लीचे प्रयत्न असतील. युवराजही या वेळी दिल्लीकडून खेळणार आहे.
{ युवराजचे वडील योगराज यांच्या विखारी टीकेनंतर धोनी आणि युवी प्रथमच समोरासमोर असतील.