मुंबई - गेल्या वर्षी मुंबईतील प्रतिष्ठित हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत विक्रमी ५४६ धावा काढून लक्ष वेधणारा १४ वर्षीय पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रीडा साहित्य तयार करणारी कंपनी एसजीने त्याच्यासोबत ३६ लाखांचा करार केला.
पृथ्वीला एसजी ६ वर्षे प्रायोजित करणार आहे. एसजीकडून करारबद्ध खेळाडूंत पृथ्वी सर्वांत युवा िक्रकेटपटू आहे. तो सर्वसाधारण कुटुंबातील असल्याने त्याला कंपनीने प्रायोजित केले. क्रीडा साहित्यासह प्रवास आणि प्रशिक्षणाचा खर्चदेखील कंपनी करणार आहे. त्याच्यात भारतीय संघाकडून खेळण्याची क्षमता असल्याचेे कंपनीचे संचालक पारस आनंद यांनी सांगितले.