आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीग: मुंबा- जयपूर फायनल रंगणार, पाटणा पायरेट्सचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रो कबड्डी लीगच्या किताबासाठी यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात फायनल रंगणार आहे. यजमान मुंबा संघाने शुक्रवारी उपांत्य लढतीत बंगळुरू बुल्सचा २७-२३ अशा फरकाने पराभव केला. दुसरीकडे जयपूर पिंक पँथर्सने सेमीफानयलमध्ये पाटणा पायरेट्सवर मात केली. नवनीत गौतमच्या नेतृत्वाखाली जयपूर पिंक पँथर्स संघाने शुक्रवारी अंतिम फेरीत धडक मारली. या संघाने उपांत्य लढतीत पाटणा पायरेट्सचा पराभव केला. अभिषेक बच्चनच्या पँथर्स संघाने रंगतदार लढतीत ३८-१८ अशा फरकाने विजय संपादन केला.

जसवीरसिंग (१०) आणि राजेश नारवाल (७) यांनी केलेल्या चुरशीच्या खेळीच्या बळावर पिंक पँथर्सने सामना आपल्या नावे केला. पाटणा संघाकडून रवी दयाल (५) आणि सुरेश कुमारने (५) केलेली खेळी व्यर्थ ठरली.

अनुप, मोहितची झुंज
यू मुंबा संघाकडून अनुप कुमार आणि मोहितने शर्थीची झुंज दिली. त्यांनी प्रत्येकी सहा गुणांची कमाई करताना संघाला विजय मिळवून दिला. तसेच ऋषंक देवडिंगेने तीन आणि विशाल मानेने संघाच्या विजयात दोन गुणांचे योगदान दिले.