आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो-लीग कबड्डीमधील सामने फिक्स : पाथ्रीकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देश-विदेशातील कबड्डीपटूंना घेऊन एका स्पोटर््स क्लबने सुरू केलेल्या कबड्डी लीगची संकल्पना महाराष्ट्र कबड्डी संघटनेचीच असून त्या संकल्पनेची चोरी करूनच प्रो-कबड्डी लीग सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रो-लीगमधील अनेक सामने फिक्स असल्याचे दिसत असून या स्पर्धेत अंतिमत: जयपूरचाच संघ (अध्यक्ष जनार्दन गेहलोत यांच्या राज्यातील) विजेता होणार असून तोच निकाल दिसेल, असा आरोप महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र व इतर राज्य संघटनेशी विचारविनिमय न करता केवळ कबड्डी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जनार्दन गेहलोत यांच्याशी संगनमत करून प्रो-लीगचा डाव रचण्यात आला आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद नसलेल्या या सामन्यांना केवळ प्रायोजक व उच्चभू्र सोसायटीतले लोकच हजेरी लावत आहेत. या वर्गातील किंवा त्यांच्या घरातील एक-दोन मुलेदेखील कबड्डीकडे वळणार नाही. त्यामुळे याचा प्रसार होण्यास कोणतीही मदत होणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याला स्थान दिल्याने कबड्डीला वलय मिळत असले, तरी त्याने खेळाडू निर्माण होण्यात काहीच साहाय्य होणार नसल्याचेही पाथ्रीकर यांनी नमूद केले.

कबड्डीच्या राष्ट्रीय अध्यक्षांना विचारणार जाब
कबड्डीचे राष्ट्रीय अध्यक्ष गेहलोत यांनी कोणत्याही राज्याच्या कबड्डी संघटनेशी सल्लामसलत न करता तसेच राज्य संघटनांना काहीही न विचारता परस्पर एखाद्या क्लबला प्रो-लीग चालवण्याची परवानगी दिलीच कशी? त्याबाबतची विचारणा सर्व राज्य संघटना मिळून करणारच आहेत. त्याबाबत विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षांकडून काय उत्तर मिळते, त्यानुसार पुढील पवित्रा ठरवला जाणार असल्याचेही अध्यक्ष किशोर पाटील यांनी नमूद केले.