आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीग : युमुम्बाने बंगळुरू बुल्सला नमवले !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रो कबड्डी लीग स्पध्रेत मंगळवारी युमुम्बाने दमदार प्रदर्शन करताना आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. युमुम्बाने बंगळुरू बुल्स संघाला सहजपणे 45-34 ने पराभूत केले. या विजयासह युमुम्बाने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. युमुम्बाने स्पध्रेत आतापर्यंत सात सामने खेळताना सहा विजय मिळवले आहेत. युमुम्बा-बंगळुरू लढत येथील त्यागराज स्टेडियमवर झाली. प्रेक्षकांनीसुद्धा युमुम्बाला मोठय़ा संख्येने पाठिंबा दिला. युमुम्बाने सामन्यात दज्रेदार खेळ करताना बंगळुरूला संधी दिली नाही.

युमुम्बाचा कर्णधार अनुप ठाकूर आणि विशाल माने यांनी सामना गाजवला. दोघांनी शानदार खेळ करून अनुक्रमे ‘स्टार रायडर’ आणि ‘बेस्ट डिफेंडर ऑफ द मॅच’ हे महत्त्वाचे पुरस्कार जिंकले. दुसरीकडे बंगळुरू बुल्स संघाकडून कर्णधार मनजित चिल्लरने चांगला खेळ करताना मेहनत घेतली. मात्र, त्याला संघातील इतर खेळाडूंकडून अपेक्षित असे सहकार्य मिळाले नाही.

मंगळवारच्या लढतीत दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. थोड्या वेळानेच युमुम्बाने आपल्या खेळाची चुणूक दाखवण्यास सुरुवात केली. या स्पध्रेत आपण अद्याप अजेय का आहोत, हे युमुम्बाने सिद्ध केले. युमुम्बाच्या खेळाडूंनी बंगळुरूच्या खेळाडूंना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. कर्णधार अनुप कुमार आणि मागच्या सामन्यात हीरो शब्बीरच्या कामगिरीच्या बळावर युमुम्बाने पहिल्या हाफमध्ये 23-13 ची आघाडी घेतली होती.

दुसर्‍या हाफमध्ये युमुम्बाने अधिक आक्रमक आणि मजबुतीने खेळ केला. या वेळी युमुम्बाने काही यशस्वी चढाया करीत बंगळुरूला बॅकफुटवर ढकलले. अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना बंगळुरूने सामन्यात पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. युमुम्बाने त्यांना संधी दिली नाही. या विजयानंतर युमुम्बा नंबर वनच्या सिंहासनावर कायम असून, बंगळुरू संघ दुसर्‍या स्थानी आहे.