आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो-कबड्डी लीग : ‘इमामी’च्या ‘नवरत्न’ ब्रँडसाठी पाटणा पायरट्सची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘प्रो-कबड्डी लीग’चा डेरा उद्यापासून पाटणा येथे दाखल होत असून, 10 ऑगस्टपर्यंत येथे सामने होतील. या लढतींचे औचित्य साधून ‘इमामी’ या कंपनीने आपल्या ‘नवरत्न’या ब्रॅँडसाठी यजमान ‘पाटणा पायरट्सची’ निवड केली आहे. दोन वर्षांकरिता ‘नवरत्न’ या उत्पादनाचे ब्रँड म्हणून पाटणा पायरट्सची आज निवड करण्यात आल्याचे ‘इमामी’चे सरव्यवस्थापक अनुपम कथेरिया यांनी जाहीर केले.

‘आम्ही ज्या वातावरणात वाढलो त्या वातावरणातला कबड्डी हा अतिशय लोकप्रिय असा खेळ आहे.’ ‘प्रो -कबड्डी’च्या माध्यमातून आपल्या या लोकप्रिय देशी खेळाला प्रथमच प्रोत्साहन व मान्यता मोठ्या स्तरावर (आर्थिक) मिळत आहे. त्यामुळेच आमचा छोटासा वाटा उचलण्यासाठी आम्ही ‘नवरत्न’ ब्रॅँडच्या प्रसिद्धीसाठी ‘पाटणा पायरट्सची’ची निवड केल्याचे कथेरिया यांनी सांगितले.