आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो-कबड्डीला लाभला 218 कोटींचा प्रेक्षकवर्ग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - क्रिकेट या खेळानंतर भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ कबड्डी आहे. याची पोचपावती प्रो-कबड्डी लीग सुरू झाल्याबरोबर अवघ्या दोन आठवड्यांतच मिळाली आहे. ‘टॅम’च्या पहिल्या 8 दिवसांनंतरच्या अहवालात स्टार स्पोर्ट्सवर 72 कोटी भारतीयांनी हा खेळ पाहिल्याची नोंद झाली आहे. उद्घाटनाची लढत तर जगभरातील 218 कोटी लोकांनी पाहिल्याचे ‘टॅम’चा अहवाल सांगतो.

स्टारच्या चारही वाहिन्यांवर एकाच वेळी कबड्डीच्या उद्घाटनाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. टॅमच्या अहवालात आणखीही एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे, ती म्हणजे संपूर्ण कुटुंबांनी एकत्रितपणे हे सामने पाहिले. त्यामध्ये गृहिणी, घरातील छोटी मुले आणि तरुण-तरुणींनी हे सामने पाहिले. भारतासारख्या खंडप्राय देशात विविध खेळांची लोकप्रियता असतानाही कबड्डीला लाभलेला पाठिंबा आश्चर्यचकित करणारा आहे.

प्रेक्षकवर्गात 32 टक्के महिला होत्या. 22 टक्के लहान मुले, तर 25 टक्के युवक वर्ग होता. 15 ते 25 या वयोगटातील युवा पिढीचे कबड्डीला लाभलेले पाठबळ नव्या संकेतांचे दर्शन तर घडवत नाही ना!

सध्या सुगीच्या दिवसांत शेतकर्‍यांमध्ये आनंद साजरा करण्यासाठीचा हा एक विरंगुळा देणारा खेळ होता. पंजाबच्या युवकांनी गोल कबड्डीच्या रूपात हा खेळ केव्हाच सातासमुद्रापलीकडे नेला. चित्रपट कलावंतांपासून अनेक बुद्धिजीवी, राजकारणी व यशस्वी उद्योजकांनी बालपणात कधी ना कधी या खेळाचा अनुभव घेतला आहे.

सर्व स्तरांवरून पाठिंबा
स्टार स्पोर्ट्सद्वारे या खेळाची ओळख जगात निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अधिक यश मिळाले. या लोकप्रियतेबाबत प्रश्नच नव्हता. मात्र, सर्व स्तरांवरून मिळालेला पाठिंबा आमचा उत्साह द्विगुणित करणारा आहे, असे स्टार इंडियाचे सीईओ उदय शंकर यांनी सांगितले.