आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabaddi League News In Marathi, Divya Marathi

प्रो-कबड्डी लीग: तेलुगू टायटन्स, बंगाल वॉरियर्सची विजयी घोडदौड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तेलुगू टायटन्स आणि बंगाल वॉरियर्सने प्रो-कबड्डी लीगमधील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. मात्र, यात सोमवारी पुणेरी पलटण आणि पाटणा पायरेट्सला पराभवाचा सामना करावा लागला.

नीलेश शिंदेच्या नेतृत्वाखाली बंगाल वॉरियर्सने सामन्यात पाटणा पायरेट्सवर 30-28 अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. पाटणा संघाकडून संदीप नारवालने केलेली 15 गुणांची खेळी व्यर्थ ठरली. अवघ्या दोन गुणांच्या आघाडीने बंगालने सामना जिंकला.महेंद्र राजपूत आणि नितीन मदनेने संघाच्या विजयात प्रत्येकी पाच गुणांचे योगदान दिले. तसेच बाजीराव आणि नीलेश शिंदेने संघाला प्रत्येकी दोन गुण मिळवून दिले. आघाडीचा सुनील जयपाल मात्र या सामन्यात सपशेल अपयशी ठरला.

राजगुरू सुब्रमण्यमच्या नेतृत्वाखाली तेलुगू टायटन्स संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये विजयी चौकार मारला. या संघाने पुणेरी पलटणचा 60-24 ने पराभव केला.