आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabaddi League: Patna Mark Home Territory With A Win

प्रो-कबड्डी लीग : पाटणा पायरट्सची पुणेरी पलटणवर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाटणा पायरट्स संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये गुरुवारी घरच्या मैदानावर पाहुण्या पुणेरी पलटणचा 37-27 अशा फरकाने पराभव केला. राकेश कुमार, संदीप नारवाल आणि रवी दयालने केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर यजमान संघाने धडाकेबाज विजयाची नोंद केली.

घरच्या मैदानावरच्या आपल्या पहिल्याच लढतीत पाटणा संघाने विजयासह उपस्थितीत चाहत्यांचीही मने जिंकली.

पुणेरी पलटणनेही पहिल्या हाफमध्ये सामन्यात आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र, दुसर्‍या हाफमध्ये यजमानांनी लढतीत दमदार पुनरागमन करताना सामन्यावर पकड घेतली. पुण्याच्या सुमार खेळीचा फायदा उचलत यजमानांच्या खेळाडूंनी सलग गुणांची कमाई केली. याच्या बळावर पाटणा संघाने लढतीत बाजी मारली.

राकेश, संदीप चमकले
पाटणा संघाकडून घरच्या मैदानावर राकेश कुमार, संदीप नारवाल आणि रवी दलालने चमकदार कामगिरी केली. यात राकेशने संघाला 9 गुण मिळवून दिले. तसेच उत्कृष्ट चढाई करून संदीपने आठ आणि रवी दलालने नऊ गुणांची कमाई करून संघाचा विजय निश्चित केला.
पाटणा आणि पुणेरी पलटण यांच्यातील रंगतदार लढतीतील चुरशीचा क्षण.