आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabaddi League Today Final, News In Maharashtra

प्रो कबड्डी लीग : यू मुम्बा Vs पिंक पँथरमध्ये आज मुंबईत रंगणार अंतिम संघर्ष!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पहिल्या वहिल्या प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर रविवारी रात्री मिळेल. यजमान "यू मुम्बा' आणि अभिषेक बच्चनच्या "पिंक पँथर' संघात आज रात्रौ वाजता अंतिम सामना होईल. त्यापूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी पटना पायरेट्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यात वाजता सामना होईल.
रविवारच्या अंतिम सोहळ्यासाठी चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंतचे सारे सितारे मुंबईच्या सरदार वल्लभभाई इनडोअर स्टेडियमवर अवतरतील. पुरस्कार वितरणासाठी अन्य क्षेत्रातील मान्यवरही अपेक्षित आहेत.

वैयक्तिक पुरस्कारांच्या शर्यतीत तेलगू टायटन्सचा संघ स्पर्धेतून बाद झाल्यामुळे १४५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अनुप कुमारला हा पुरस्कार पटकावण्याची नामी संधी आहे. यू मुम्बाचा कप्तान अनुप कुमार याने कबड्डी लीगमध्ये कायम अग्रेसर राहण्याचा पराक्रम केला आहे. त्याला चढाईसाठीच्या पुरस्कारासाठी आव्हान देऊ शकेल असा जयपूरच्या पिंक पँथरचा मजिंदरसिंग १२१ गुणांवर असून तो पुरस्कारासाठी खूपच मागे आहे.

उपांत्य फेरीच्या लढतीत शेवटच्या क्षणी स्थान मिळवणाऱ्या बंगळुरू बुल्सने यजमान "यू मुम्बा'ला अखेरपर्यंत झुंजवले. जयपूर पिंक पँथर आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील उपांत्य लढत मात्र एकतर्फी झाली. अंतिम फेरीत बलाढ्य मुंबई संघ त्यांच्या भक्कम क्षेत्रव्यूहामुळे बाजी मारील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुम्बाचा कर्णधार अनुपकुमार हादेखील सर्वाधिक अनुभवी चढाईपटू आहे.
"यू मुम्बा- पिंक पँथर अंतिम सामना अाज; घरच्या मैदानावर शानदार विजयासाठी यू मुम्बा संघ सज्ज
नाडा-राणामध्ये चुरस
पकडीसाठीच्यापुरस्कारासाठी "यू मुम्बा'चा रोहित नाडा (४६ गुण) आणि जयपूरचा रोहित राणा (३८ गुण) यांच्यात चुरस आहे. सध्या रोहित नाडा याने मनजित चिल्लर (बंगळुरू) याच्यासह संयुक्त पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे चढाई पकडीचा असे दोन्ही पुरस्कार यू मुम्बाकडे जाणार, असा अंदाज आहे.