आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PRO KABADDI: ग्‍लॅमरसोबत खेळाचा मेळ, कबड्डीचे चाहते गेले हरखून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - सामन्‍यादरम्‍यानचा एक क्षण )
पाटणा - पाटणा आणि पुणे यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या अत्‍यंत चुरसीच्‍या लढतीमध्‍ये पाटणाने पुणे फलटनवर 35 -27 अशा फरकाने मात केली. सामन्‍याला आलेल्‍या ग्‍लॅमरमुळे पाटण्‍यातील क्रिडाप्रेमी हरखून गेली होती. तर झगमगाटापुढे दिपून गेली होती.

अटीतटीची लढत
घरच्या मैदानावरच्या आपल्या पहिल्याच लढतीत पाटणा संघाने विजयासह उपस्थितीत चाहत्यांचीही मने जिंकली. पुणेरी पलटणनेही पहिल्या हाफमध्ये सामन्यात आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र, दुसर्‍या हाफमध्ये यजमानांनी लढतीत दमदार पुनरागमन करताना सामन्यावर पकड घेतली.
चाहते गेले हरखून
एरव्‍ही लाल मातीत होणा-या कबड्डील एवढे वैभव प्राप्‍त होणार असे कोणत्‍याच चाहत्‍याने स्‍वप्‍नातसुध्‍दा पाहिले नसेल. परंतु अत्‍यंत शिस्‍तबध्‍दपणे, दिग्‍गजांच्‍या उपस्थितीत अन् ग्‍लॅमरच्‍या छटेमुळे क‍बड्डीप्रेमी हरखून गेले आहेत. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यची निवडक छायाचित्रे..