आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabaddi Match News In Marathi, Mumbai, National Sports Club

प्रो-कबड्डीचा दम आजपासून घुमणार; पाक खेळाडू सहभागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मैदानी आणि मर्दानी खेळ म्हणून ओळखला जाणारा कबड्डी हा खेळ आता मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लबच्या बंदिस्त क्रीडागृहामध्ये खेळवण्यात येणार आहे. कबड्डी हा खेळ अनेक शतके भारतामध्ये खेळला जात आहे; परंतु दुर्दैवाने या खेळास अपेक्षित आणि आवश्यक असे वलय मिळाले नाही. त्यामुळे आजही हा खेळ उच्चभ्रूंच्या दिवाणखान्यात पोहोचला नाही.
आता स्टार स्पोर्ट्स प्रो-कबड्डीच्या माध्यमातून या देशी खेळास हे वलय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मार्शल स्पोटर््सचे चारू शर्मा यांनी सांगितले व हे सामने ही त्याची पहिली पायरी असल्याचे त्यांनी सांगितले. हे सामने प्रथमच उघड्या मैदानातून स्टेडियमच्या वातानुकूलित बंदिस्त क्रीडागृहात खेळवण्यात येणार असून त्यासाठी जांभळ्या रंगाची मॅट अंथरण्यात आली आहे. संपूर्ण क्रीडागृह दिव्यांनी उजळले आहे.

आठ शहरांत सामने
स्पर्धेतील सामने पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू आदी प्रमुख आठ शहरांत होणार आहेत. बंगळुरू बुल्स, पुणेरी पलटन, पाटणा पायरेट्स, तेलुगू टायटन, यू मुंबा आदी संघ तयारी करत आहेत. 50 लाख रुपये विजयी संघास देण्यात येणार आहे.