आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राे-कबड्डी लीग: दबंग दिल्लीची पुणेरी पलटणवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- जसमेरसिंगच्या दबंग दिल्ली संघाने प्राे-कबड्डी लीगमध्ये पाचव्या विजयाची नाेंद केली. या संघाने साेमवारी पुणेरी पलटणचा ४५-२२ अशा फरकाने पराभव केला. यासह पुण्याच्या संघाला लीगमध्ये ११ व्या पराभवाला सामाेरे जावे लागले. अवघ्या १६ गुणांसह पुणेरी पलटण गुणतािलकेत तळात अाहे. दबंग दिल्लीने सहावे स्थान कायम ठेवले.

काशीलिंग अडकेने संघाच्या विजयात सर्वािधक १५ गुणांचे याेगदान दिले. त्याने चुरशीची चढाई करून संघाचा माेठ्या फरकाने विजय निश्चित केला. सुरजित अाणि रवींदरसिंगने दिल्लीकडून प्रत्येकी पाच गुणांची कमाई केली. कर्णधार जसमेरला केवळ दाेनच गुण मिळवता अाले. मात्र, त्याने केलेल्या सुरेख डावपेचामुळे दबंग दिल्ली संघाला सामना जिंकता अाला.

वजीरची खेळी व्यर्थ
पुणेरी पलटण संघाकडून वजीर सिंगने केलेली खेळी व्यर्थ ठरली. त्याने संघाकडून सर्वािधक दहा गुण मिळवले. मात्र, मनाेज कुमार (२), कालीमुथू (०), स्वप्निल (२), सागर (०) सारखे दिग्गज खेळाडू सपशेल अपयशी ठरले.
पाटणा पायरेट्सचा विजयी षटकार
पाटणा पायरेट्स संघाने साेमवारी रात्री बंगळुरू बुल्सला ३३-२१ अशा फरकाने पराभूत केले. याशिवाय पाटणा संघाने लीगमध्ये विजयी षटकार ठाेकला. रवी दयालने अाठ, सुरेशकुमारने संघाच्या विजयात सहा गुणांचे याेगदान दिले. तसेच मनदीपकुमारने चार, गिरीश एर्नाकने दाेन , संदीपने तीन गुणांची कमाई केली.