आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabbadi League News In Marath, Jaipur Panthers, Divya Marathi

प्रो-कबड्डी लीग : जयपूर पँथर्स अव्वलस्थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - यजमान जयपूर पिंक पँथर्स संघाने धडाकेबाज वजियासह प्रो-कबड्डी लीगच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी धडक मारली. या संघाने घरच्या मैदानावर बंगळुरू बुल्सचा ३६-३१ अशा फरकाने पराभव केला. या संघाचे गुणतािलकेत ४० गुण झाले आहेत. तसेच ३८ गुणांसह यू मुम्बाची दुस-या स्थानावर घसरण झाली.

राजेश नारवाल यजमान जयपूरच्या वजियाचा हीरो ठरला. त्याने सर्वाधिक ९ गुणांची कमाई केली. त्यापाठाेपाठ मनिंदर सिंग आणि नवनीत गाैतमने संघाच्या वजियात प्रत्येकी सहा गुणांचे याेगदान दिले. घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात जयपूर संघाने दमदार सुरुवात केली. राजेश, मनिंदर, नवनीतने सुरेख खेळी करताना संघाला मध्यंतरापूर्वीच २०-१७ ने आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर कर्णधार नवनीत गाैतमने सामन्यातील चमकदार खेळी कायम ठेवून संघाचा वजिय नशि्चित केला. जयपूर संघाचा लीगमधील हा आठवा वजिय ठरला. यासह या संघाने मुंबईवर मात करून अव्वल स्थान गाठले. तसेच बंगळुरू संघाला चाैथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.