आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabbadi League News In Marathi, Divya Marahti, Telgu Titans

प्रो कबड्डी लीग: तेलगू टायटन्सचा विजयी षटकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - राजगुरू सुब्रह्मण्यमच्या नेतृत्वाखाली तेलगू टायटन्स संघाने प्रो कबड्डी लीगमध्ये विजयाचा षटकार ठोकला. या संघाने शनिवारी पाटणा पायरेट्सचा ३२-२९ अशा फरकाने पराभव केला. तेलगू संघाचा स्पर्धेतील हा सहावा विजय ठरला. या शानदार विजयासह टायटन्सने गुणतालिकेतील आपले तिसरे स्थान अधिक मजबूत केले. दुसरीकडे पाटणा संघाला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. पाटणा संघ ४० गुणांसह चाैथ्या स्थानावर अाहे. सुकेशच्या शानदार खेळीच्या बळावर टायटन्स संघाने सामना िजंकला. त्याने संघाच्या विजयात नऊ गुणांचे याेगदान दिले. तसेच राहुल चाैधरीने अाठ, दीपक हुड्डा अाणि डी. गाेपूने प्रत्येकी तीन गुणांची कमाई केली.

रवी, संदीपची खेळी व्यर्थ
पाटणा पायरेट्स संघाकडून रवी दयाल अाणि संदीप नारवालने शानदार खेळी केली. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता अाला नाही. यात रवीने पाच अािण संदीपने अाठ गुणांची कमाई केली. तसेच गिरीश एर्नक अाणि वसीम साजेदने प्रत्येेकी दाेन गुण मिळवले.