आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pro Kabbadi League News In Marathi, Jaipur Panthers, Patna Team, Divya Marathi

प्रो कबड्डी लीग : जयपूर पँथर्सच्या विजयी मोहिमेला ब्रेक, पाटणा संघाचा 52-30 ने विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी जयपूर पिंक पँथर्स संघाच्या विजयी रथाला ब्रेक लागला. या वेळी पाटणा संघाने लढतीत जयपूरच्या पिंक पँथर्सचा 52-30 अशा फरकाने पराभव केला. यासह पँथर्सला लीगमध्ये दुस-या पराभवाला सामोरे जावे लागले.या शानदार विजयासह पाटणा संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. तसेच या लीगमध्ये 15 दिवसांपूर्वी कोलकाता संघाकडून मिळालेल्या पराभवाचाही वचपा काढला.

राकेश कुमारच्या नेतृत्वाखाली पाटणा संघाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे वेळोवेळी शानदार चढाई करून पाटणा संघाच्या खेळाडूंनी गुणांची कामाई केली. मध्यंतरापूर्वीच लढतीत आघाडी मिळवली. दरम्यान, अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्सला शेवटच्या मिनिटापर्यंत लढतीत चोख प्रत्युत्तराची खेळी करता आली नाही. निराशाजनक खेळीमुळेच या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

संदीपची उत्कृष्ट चढाई
पाटणा संघाकडून संदीपने सर्वाधिक 15 गुणांची कमाई केली. त्याने उत्कृष्ट चढाई करून जयपूर पिंक पँथर्स संघाच्या अनेक खेळाडूंना बाद केले. त्यापाठोपाठ राकेश कुमारने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने संघाला 11 गुण मिळवून दिले. राजेशने 9, जसवीर आणि मनिंदरने प्रत्येकी सात गुण मिळवून दिले.