आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजारा ठरला सर्वोत्‍कृष्‍ट युवा क्रिकेटपटू, आयसीसीचे वार्षिक पुरस्‍कार जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - भारताचा युवा फलंदाज चेतेश्‍वर पुजारा यावर्षीचा सर्वोत्‍कृष्‍ट उदयोन्‍मुख क्रिकेटपटू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (शुक्रवार) व‍ार्षिक पुरस्‍कारांची घोषणा केली. भारताच्‍या पदरी या पुरस्‍कारांमध्‍ये निराशाच पडली आहे. यावर्षी ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्‍लार्क सर्वोत्‍कृष्‍ट क्रिकेटपटू आणि कसोटीतील सर्वोत्कृष्‍ट क्रिकेटपटूचा पुरस्‍कार मिळाला आहे. तर श्रीलंकेचा धडाडीचा फलंदाज कुमार संगकारा याला वन डे क्रिकेटमधील सर्वोत्कृष्‍ट क्रिकेटपटूचा पुरस्‍कार मिळाला आहे.

चेतेश्‍वर पुजाराचा हा पहिलाच आयसीसी पुरस्‍कार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने एक हजार धावा करणारा पुजारा हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला होता. ही कामगिरी करताना त्‍याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतकही ठोकले होते. या खेळीदरम्‍यान त्‍याने मुरली विजयसोबत विक्रमी 370 धावांची भागीदारी केली होती. पुजाराने 15 कसोटींमध्‍ये 65.50 च्‍या सरासरीने 1310 धावा केल्‍या आहेत.

या पुरस्‍कार सोहळ्याचे शनिवारी प्रसारण करण्‍यात येणार आहे. रिकी पॉटींग याने सोहळ्याचे सुत्रसंचालन केले आहे.