आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसीय सामना: पुजाराचे त्रिशतकी वादळ, भारताचा पहिला डाव 564 वर घोषित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुबळी - भारत अ संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने नाबाद 306 धावांची खेळी केली. या त्रिशतकाच्या बळावर भारताने शुक्रवारी वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध तिस-या चार दिवसीय सामन्याच्या तिस-या दिवसाअखेर 564 धावांवर पहिला डाव घोषित केला. यासह भारतीय संघ अद्याप 180 धावांनी आघाडीवर आहे.


पाहुण्या विंडीजने दुस-या डावात तिस-या दिवसअखेर तीन बाद 116 धावा काढल्या. हा संघ 180 धावांनी पिछाडीवर असून त्यांच्याकडे सात विकेट शिल्लक आहेत.


चेतेश्वर पुजाराने 415 चेंडूंचा सामना करताना 33 चौकारांच्या साह्याने दहा तासात नाबाद 306 धावा काढल्या. त्याचे करिअरमधील हे तिसरे त्रिशतक ठरले. ही उल्लेखनीय कामगिरी करणारा पुजारा हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी, रवींद्र जडेजाने ही कामगिरी केली आहे.


भारताने शुक्रवारी सकाळी तीन बाद 334 धावांवरून खेळायला सुरुवात केली. पुजारा 139 आणि नायर 10 धावांवर नाबाद होते. पुजाराने पुढे खेळताना पहिले द्विशतक आणि त्यानंतर त्रिशतक पूर्ण केले. मात्र, दुस-या टोकाने भारताच्या झटपट विकेट पडल्या. मात्र, पुुजाराने संघाची बाजू सावरली. नायर 11, पारस डोंग्रा 7, उदय कौल 26, धवल कुलकर्णी 6, जहीर खान 19 आणि भार्गव भट भोपळा न फोडता तंबूत परतला.


वेस्ट इंडीजची निराशाजनक सुरुवात
पहिल्या डावात 296 धावांच्या अंतराने पिछाडीवर पडलेल्या पाहुण्या विंडीजची दुस-या डावात निराशाजनक सुरुवात झाली. या संघाने 57 धावांसाठी तीन गडी गमावले. कर्णधार पॉवेलला (6) जहीर खानने पायचीत करून तंबूत पाठवले. त्यापाठोपाठ धवल कुलकर्णीने लियोन जॉन्सनला (1) त्रिफळाचीत करून पाहुण्या टीमला जबर धक्का दिला. त्यानंतर ईश्वर पांडेने क्रेग बे्रथवेटला (21) पायचीत केले. दरम्यान, नरसिंग देवनरेन (44) आणि असद फुदाद्दीन (36) यांनी नाबाद खेळी करून संघाचा डाव सावरला. मात्र, विंडीजवरचे पराभवाचे सावट अद्याप कायम आहे.


संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव 9 बाद 564 डाव घोषित (पुजारा नाबाद 306,गंभीर 123, 3/106 नुर्स ) वेस्ट इंडीज : दुसरा डाव : 3 बाद 116 (नरसिंग नाबाद 44, फुदाद्दीन नाबाद 36).


पुजारा लाराच्या एलिट लीगमध्ये
भारत अ संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने शुक्रवारी आपले करिअरमधील तिसरे त्रिशतक
झळकवले. या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याने क्रिकेट विश्वातील डब्ल्यूजी ग्रेस, ग्रीम हिक आणि ब्रायन लारासारख्या महान फलंदाजांच्या एलिट लीगमध्ये स्थान मिळवले. ब्रॅडमॅन सहा त्रिशतके ठोकून अव्वल स्थानावर आहेत. बिल पोंसफोर्ड आणि हेमंडने प्रत्येकी चार त्रिशतके झळकावले आहेत. डब्ल्यूजी ग्रेस, ग्रीम हिक, लारा, मायकेल हसी आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन त्रिशतके ठोकली आहेत.


पुजाराने या ठिकाणी सुरू असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या चारदिवसीय सामन्यात नाबाद 306 धावा काढल्या. टीम इंडियाची ‘नवी भिंत’ म्हणून ओळखला जाणारा पुजारा हा त्रिशतक ठोकणारा जगातील नववा फलंदाज ठरला.