आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीसी कसोटी क्रमवारीत पुजारा सहाव्‍या तर ओझा दहाव्‍या स्‍थानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्‍वर पुजाराने एका क्रमांकाची प्रगती करीत सहाव्‍या क्रमांकावर उडी घेतली आहे. तर प्रग्‍यान ओझा गोलंदाजांच्‍या यादीत दहाव्‍या स्‍थानी पोहोचण्‍यास यशस्‍वी ठरला आहे. सोमवारी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारी केली.

आघाडीच्‍या पहिल्‍या 20 जणांत स्‍थान मिळवणारा पुजारा भारताचा एकमेव फलंदाज आहे. गोलंदाजीत आर.अश्विनला एका क्रमांकाने खाली उतरावे लागले आहे. ताज्‍या यादीत तो आठव्‍या स्‍थानी पोहोचला आहे. तर झहीर खान 17 व्‍या स्‍थानी आहे.

अँशेज मालिकेत सलग दुसरी कसोटी जिंकणा-या इंग्‍लंड संघाला क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. इयान बेल आणि ज्‍यो रूट फलंदाजीत तर ग्रीम स्‍वानला गोलंदाजीतील कामगिरीचा चांगलाच फायदा झाला आहे.