आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pujara Yet Not Prove His Good Form In Foreign Wicket Says Dean Jones

चेतेश्वर पुजाराची परीक्षा व्हायची आहे : डीन जोन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चेतेश्वर पुजाराने घरच्या मैदानावर दोन वेळा द्विशतक ठोकून स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र, विदेशी भूमीवर त्याची कसोटी होणे शिल्लक आहे. विदेशी भूमीवरच त्याची खरी परीक्षा होईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्सने म्हटले आहे.

विदेशी जमिनीवर त्याने दोन कसोटीच्या तीन डावांत फक्त 31 धावा काढल्या. कसोटी पदार्पणानंतर पुजाराची तुलना राहुल द्रविडशी केली जात आहे. यावर जोन्स म्हणाले, ‘द्रविडशी तुलना करणे घाईचे होईल. पुजाराने आपल्या कारकीर्दीत आता फक्त 11 कसोटी सामने खेळले आहेत. यातील विदेशात त्याने फक्त दोन सामने खेळले.’