आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#Rio: कोच गोपीचंदमुळे शांत सिंधू झाली आक्रमक, यामुळे कोर्टवर मिळाले तिला यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादमध्ये गोपीचंदच्या बॅडमिंटन अॅकेडमीत पी व्ही सिंधू आणि श्रीकांत यासारखे खेळाडू खूप काळापासून ट्रेनिंग घेत आहेत. गोपीचंद सर्वात जास्त लक्ष शटलर्सच्या फिटनेसवर देतात. - Divya Marathi
हैदराबादमध्ये गोपीचंदच्या बॅडमिंटन अॅकेडमीत पी व्ही सिंधू आणि श्रीकांत यासारखे खेळाडू खूप काळापासून ट्रेनिंग घेत आहेत. गोपीचंद सर्वात जास्त लक्ष शटलर्सच्या फिटनेसवर देतात.
नवी दिल्ली- रिओ ऑलिंपिकमध्ये देशासाठी आणखी एक पदक निश्चित केलेल्या बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू हिच्या यशामागे तिचे कोच पुलेला गोपीचंद यांचा मोठा हात आहे. सिंधू 12 वर्षापासून गोपीचंदकडे कोचिंग करीत आहे. सुरुवातीला ती खूपच डिफेन्सिव असायची. कोचने सांगितल्यानंतरही तिच्यात आक्रमकपणा येत नव्हता व तो दिसत नव्हता. त्यावेळी गोपीचंद तिला तासनतास ओरडायला सांगायचा. याचप्रमाणे कोचने तिचे आवडते चॉकलेट आणि हैदराबादी बिर्यानी खाण्यावर बंदी घातली गेली होती. बाहेरचे पाणीही पिऊन देत नव्हता गोपीचंद...
- हैदराबादमध्ये गोपीचंदच्या बॅडमिंटन अॅकेडमीत पी व्ही सिंधू आणि श्रीकांत यासारखे खेळाडू खूप काळापासून ट्रेनिंग घेत आहेत. गोपीचंद सर्वात जास्त लक्ष शटलर्सच्या फिटनेसवर देतात. प्लेयर्सला बाहेरचे पाणी सुद्धा ते पिऊन देत नाहीत. त्याने आपल्या अॅकेडमीत ब्रेड आणि शुगरला पूर्णपणे बंदी घातली आहे. रिओत जाणा-या खेळाडूंसोबत प्रॅक्टिस करावा लागत असल्याने गोपीचंद सुद्धा 8 महिन्यापासून कार्बोहायड्रेट वाढवणा-या पदार्थापासून दूर आहे.
गोपीचंदने सांगितले, ओरड नाहीतर रॅकेट हातात घेऊ देणार नाही-
- या ऑलिंपिकमध्ये सिंधूच्या खेळात जबरदस्त बदल झालेला दिसला. प्रत्येक पाँईंट जिंकल्यानंतर तो उत्स्फूर्तपणे ओरडायची.
- त्यापूर्वी ती अशी कधीही करायची नाही. तो शांतपणे खेळ करायची. मात्र कोच पुलेला गोपीचंदने तिचा आक्रमक वाढविण्यासाठी ओरडायची सवय लावली.
- गोपीचंदने एकदा प्रॅक्टिसदरम्यान कोर्टाच्या मध्येच उभे केले. तसेच सर्व बाजूंनी 50 हून खेळाडू व कोच यांना उभे केले. यानंतर सिंधूला सांगितले की, जोरजोराने ओरड. सिंधू तयार नव्हती. तसेच ओरडणे तिला जमत नव्हते.
- तेव्हा कोचने तिला सांगितले की, असे केले नाही तर तुला रॅकेट हातात धरू देणार नाही. सिंधू रडायला लागली. मात्र, प्रयत्नानंतर तो हळू हळू ओरडायला लागली. यानंतर ती अनेक तास अॅकेडमीत एकटीच ओरडात राहायची. यामुळे तिच्या खेळात आक्रमकपणा आला.
वडिलांनी घेतली होती 8 महिन्याची सुट्टी-
- 5 जुलै 1995 रोजी जन्मलेली पुसरला वेंकटा सिंधूचे आई-वडिल व्हॉलीबॉल खेळाडू राहिले आहेत. वडिल पी व्ही रमन्ना यांना व्हॉलीबॉलसाठी अर्जुन अवॉर्ड मिळाला होता.
- रिओ ऑलिंपिकची सिंधूची चांगली तयारी व्हावी यासाठी त्यांनी 8 महिने रेल्वेतून सुट्टी घेतली होती.
- ते रोज पहाटे 4 वाजता उठून हैदराबादमधील आपल्या घरापासून 30 किमी दूर गाची बावलीत सिंधूला ट्रेनिंगसाठी पुलेला गोपीचंदच्या अॅकेडमीत घेऊन जायचे. ते इतर खेळाडूंशी सिंधूच्या खेळाबाबत व तयारीबाबत चर्चा करायचे.
- ते म्हणतात निकाल आता येत असतील पण यासाठी मागील पाच महिने खूप कठीण काळ होता.
- सिंधूला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. ती मागील तीन वर्षापासून रिओ ऑलिंपिकची तयारी करीत होती.
विजयानंतर गोपीचंद म्हणाला, भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे-
- सिंधूने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर मिडियाशी बोलताना गोपीचंद म्हणाला, '' त्यावेळी खूप प्रेशर होता. मागील काही दिवसापासून फार काही चांगले घडत नव्हते. आम्ही खूप मेहनत घेतली. मी कोर्टावर काहीही भावना दाखवू इच्छित नव्हतो. सिंधूची उद्या आणखी एक महत्त्वाची मॅच आहे. आम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल.
- ''मला माझ्या ऑलिंपिक (200द सिडनी)ची आठवण आली. मी सिंधू आणि श्रीकांत यासारथ्या खेळाडूंना नेहमी म्हणतो की, ही संधी परमेश्वराने दिली आहे ती गमावली नाही पाहिजे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भारताला दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देऊ शकते सिंधू...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...