आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Delhi Match Draw In Indian Super League Football

इंडियन सुपर लीग फुटबॉल: पुणे-दिल्ली लढत ड्रॉ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत पाहुण्या पुणे एफसीला घरच्या मैदानावर रोखण्याचा यजमान दिल्ली डायनामोज संघाचा प्रयत्न मंगळवारी अपयशी ठरला. पाहुण्या पुणे संघाच्या खेळाडूंनी सुरेख पासिंगवर यजमान दिल्लीला ०-० गोलने बरोबरीत रोखून सामन्यातील पराभव टाळला. फुटबॉलच्या विश्वातील दिग्गज पियरेच्या उपस्थितीनंतरही दिल्ली संघाला सामन्यात विजयश्री खेचून आणता आली नाही.
स्टार खेळाडूंनी केलेल्या सुमार खेळीमुळे दिल्लीचे विजयाचे मनसुबे उधळले गेले. अतिरिक्त तीन मिनिटांनंतरही दोन्ही संघांतील खेळाडूंना गोल करता आला नाही. सामन्यानंतर भारताची टेनिसपटू सानिया मिर्झासह सिनेअभिनेत्री काजल अग्रवालनेही ‘किक’साठी खेळी केली.
पुणे एफसीला शनिवारी डी.वाय. पाटील स्टेडियमवर मुंबईच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सलामी सामन्यातील पराभवातून सावरलेली मुंबई घरच्या मैदानावरून विजयी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करेल.

गोवा-चेन्नइयन आज लढत : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सिनेअभिनेता अभिषेक बच्चनच्या चेन्नइयन एफसीला बुधवारी फार्ताडोच्या मैदानावर यजमान एफसी गोवा संघाच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागले.

मुंबई सिटीचा कर्णधार सय्यद नबी जखमी
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा सुरू होऊन दोन दिवसही झाले नसताना मुंबई सिटी एफसी संघ अडचणीत सापडला आहे. टाच आणि गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यांचा कर्णधार सय्यद रहिम नबी तीन आठवड्यासांठी फुटबॉल खेळू शकणार नाही. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. स्पर्धेतील मुंबईच्या पहिल्याच सामन्यात अ‍ॅटलेटिको डी कोलकाताविरुद्ध लढतीत नबी जखमी झाला होता. सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला नबीला दुखापत झाली. "सामन्यादरम्यान नबीला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी पाहणी केली, तेव्हा त्याच्या पायात दुखापत असल्याचे सिद्ध झाले. तो काही दिवस खेळू शकणार नाही,' असे क्लबच्या वतीने मंगळवारी सांगण्यात आले.

दिल्लीचा सामना; स्टेडियम हाऊसफुल्ल
दिल्ली डायनोमोस वि. पुणे सिटी संघातील पहिल्या सामन्यासाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियमची सर्व तिकिटांची विक्री झाली. यामुळे हे स्टेडियम हाऊसफुल्ल राहण्याची दाट शक्यता आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ६० हजार इतकी आहे.