आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: फिंच, स्मिथमुळे पुण्याने 20 धावा अधिक बनवल्याने नुकसान- स्टीफन फ्लेमिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- अ‍ॅरोन फिंच आणि स्टीव्हन स्मिथच्या फलंदाजीमुळे पुणे वॉरियर्सने चेन्नईविरुद्ध 20 धावा जास्तीच्या केल्या. या अतिरिक्त धावा आम्हाला चांगल्याच महागड्या ठरल्या, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपरकिंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सामन्यानंतर व्यक्त केली.

फिंचने खूपच आक्रमक खेळ केला. त्याला नशिबाचीही साथ मिळाली. त्याने जी आक्रमक सुरुवात करून दिली, ती खूपच खतरनाक होती. नंतर स्मिथनेसुद्धा हीच लय कायम ठेवून धावगती वाढवली. पुण्याला आम्ही 140 धावांत रोखायला हवे होते. मात्र, 20 ते 25 धावा अधिक झाल्याने आम्हाला फटका बसला, असेही त्याने नमूद केले.