आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Warriors India Vs Rajasthan Royals Ipl Match Live

IPL: पुणे वॉरियर्सची विजयी गुढी; राजस्थानवर 7 गड्यांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आयपीएल-6 मध्ये सुरुवातीच्या दोन लढतीत फारसा संघर्ष न करता गुडघे टेकणार्‍या पुणे वॉरिसर्यने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार लढा देत 7 गड्यांनी विजय मिळवला. पुण्याचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. शानदार फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सला विजयी हॅट्ट्रिक करण्यापासून वॉरिसर्यने रोखले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 5 बाद 145 धावा काढल्या. प्रत्युत्तरात वॉरियर्सने हे लक्ष्य 3 गड्यांच्या मोबदल्यात सहज गाठले.

धावांचा पाठलाग करताना पुणे वॉरियर्सकडून सलामीवीर फिंचने (64) अर्धशतक ठोकले. फिंच आणि उथप्पा या जोडीने 58 धावांची सलामी दिली. उथप्पाने 16 चेंडूंत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा काढल्या. फिंचने अवघ्या 53 चेंडूंत 3 षटकार आणि 6 चौकारांसह ही खेळी केली. पुण्याकडून युवराजसिंगने नाबाद 28 धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. युवीने 23 चेंडूंत 2 षटकार आणि 2 चौकारांसह ही खेळी साकारली. रॉस टेलरने 17 धावांचे योगदान दिले. रॉयल्सकडून फुल्कनरने 2 गडी बाद केले.