आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Warriors Vs Chennai Royal Challengers IPL Live

IPL: पुणे वॉरियर्सचा चेन्नई सुपरकिंग्जला दणका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- अ‍ॅरोन फिंचचे (67) अर्धशतक आणि अशोक डिंडा, भुवनेश्वरकुमार आणि मिशेल मार्श यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर पुणे वॉरियर्सने सोमवारी चेन्नई सुपरकिंग्जला 24 धावांनी हरवले. पुण्याने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 159 धावा काढल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 8 बाद 135 धावाच काढता आल्या.


धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून एस. बद्रीनाथने सर्वाधिक 34 धावा काढल्या. मुरली विजयने 24, तर रवींद्र जडेजाने 27 धावांचे योगदान दिले. धोनी 10, अनिरुद्ध 0, सुरेश रैना 8 आणि डॅरेन ब्राव्हो एका धावेवर बाद झाले. वॉरियर्सकडून भुवनेश्वरकुमार, अशोक डिंडा आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

फिंच एकटा लढला
तत्पूर्वी, मॅथ्यूजच्या जागी रॉस टेलरने पुणे वॉरियर्स संघाचे नेतृत्व केले. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर अ‍ॅरोन फिंचचे (67) झंझावाती अर्धशतक आणि स्टीव्हन स्मिथच्या नाबाद 39 धावांच्या बळावर पुणे संघाने पाच बाद 159 धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभा केला. फिंच व रॉबिन उथप्पाने (26) पहिल्या विकेटसाठी 12.3 षटकांत 96 धावा काढल्या. दमदार सुरुवात करताना पुणे संघाने 32 धावांच्या अंतराने चार विकेट गमावल्या. मात्र, स्मिथने अंतिम दोन षटकांत जोरदार फटकेबाजी केली. फिंचने 45 चेंडूंत 67 चेंडूंत 10 चौकार व दोन षटकार ठोकले. स्टीव्हन स्मिथने अवघ्या 16 चेंडूंत नाबाद 39 धावांसाठी तीन चौकार व तीन षटकार ठोकले.

रवींद्र जडेजा, कर्णधार धोनी फ्लॉप
मागच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध रवींद्र जडेजाने दमदार प्रदर्शन करून चेन्नई सुपरकिंग्जला अवघड वाटणारा विजय मिळवून दिला होता. मात्र, या वेळी तो फ्लॉप ठरला. जडेजाने 22 चेंडूंत 1 षटकार आणि एक चौकारासह 26 धावा काढल्या. कर्णधार धोनी अवघ्या 10 धावांत चालता झाला.

फिंचची बहारदार खेळी
अ‍ॅरोन फिंचने सामन्याच्या पहिल्या षटकात डर्क नॅनेसच्या चेंडूवर तीन चौकार ठोकले. त्यानंतर त्याने पुन्हा नॅनेसच्या एका षटकात दोन चौकार, रवींद्र जडेजाच्या एका षटकात दोन चौकार आणि आर. अश्विनच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकला. त्याने दुसरा षटकार रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मारला. स्मिथने 19 व्या षटकात (नॅनेस) षटकार व चौकारासह एकूण 16 धावा काढल्या. त्याने ब्राव्होच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपने थर्ड मॅनकडे षटकार मारला.

बद्रीनाथची झुंज
चेन्नई सुपरकिंग्जकडून एस. बद्रीनाथने सर्वाधिक 34 धावा काढल्या. त्याने 26 चेंडूंत 4 चौकारांसह ही खेळी केली. वेगवान गोलंदाज मिशेल मार्शने स्मिथकरवी त्याला झेलबाद केले.