आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Warriors Vs Sunrisers Hydrabd Match In Ipl 6

IPL: वॉरियर्ससमोर आज सनरायझर्सचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दोन वेळेसची चॅम्पियन टीम चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत केल्यानंतर उत्साहित पुणे वॉरियर्सचा पुढचा सामना बुधवारी सनरायझर्स हैदराबादशी होईल. पुण्याने आतापर्यंत पाचपैकी दोन सामने जिंकले असून, सनरायझर्सने 5 पैकी तीन विजय मिळवले आहेत.


पुण्याची टीम फॉर्मात : सलामीवीर अ‍ॅरोन फिंच आणि रॉबिन उथप्पा चांगल्या फॉर्मात आहेत. मधल्या फळीत स्टिवन स्मिथने चेन्नईविरुद्ध शानदार प्रदर्शन केले होते. फ्लॉप खेळाडूंची संख्या अधिक आहे. अभिषेक नायर, मनीष पांडे अद्याप चमकू शकले नाहीत.
सनरायझर्सची मजबूत बाजू : टॉप ऑर्डरमध्ये कॅमरून व्हाइट लयीत आहे. अष्टपैलू तिसरा परेरासुद्धा चांगला खेळ करीत आहे.