आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Young Doctor Was Won German Triathlon, News In Marathi

15 तासांत हा डॉक्‍टर बनला चॅम्पियन, विदेशात फडकवला तिरंगा, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन - पुण्याच्या डॉ. निशित बिनीवालेचे वय 22 वर्षे आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याने एमबीबीएस पूर्ण केले. हा तरुण दिसायला सडपातळ आहे. मात्र, त्याने स्वत:ला उत्कृष्ट अॅथलिट म्हणून सिद्ध केले आहे. गेल्या सहा महिन्यांत त्याने जर्मन ट्रायथलॉनमध्ये सहभाग घेण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. कसून सराव केला. तो पहाटे वाजेपासून वाजेपर्यंत सराव करत असे. त्यानंतर क्लिनिकमध्ये प्रॅक्टिसही करत असे.
ट्रायथलॉनमध्ये केवळ शरीराचाच नव्हे, तर मानसिक क्षमतेचाही कस लागतो, असे निशित सांगतो.
यात 3.8 किमी पोहल्यानंतर 180 किमी सायकलिंग त्यानंतर 42 किमी रनिंग करावी लागते.
यासाठी 15 तासांचा अवधी देण्यात येतो. जर्मनीत जेव्हा ही स्पर्धा झाली तेव्हा तापमान 40 डिग्री होते. अनेक स्पर्धकांनी तापमान पाहूनच स्पर्धेतून माघार घेतली. भारताचे नाव बुलंद केल्याचा निशितला अभिमान आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, डॉ निशितची छायाचित्रे...