आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab Vs Kolkata Ipl 7 Qualifier Match Score In Marathi

IPL-7 : कोलकाता फायनलमध्ये, किंग्ज इलेव्हन पंजाबवर 28 धावांनी मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने बुधवारी आयपीएल-7 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कोलकात्याने क्वालिफायर सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर 28 धावांनी मात केली. यासह केकेआरने दुसर्‍यांदा अंतिम फेरी गाठली. यापूर्वी 2012 मध्ये फायनल गाठून कोलकात्याने किताब जिंकला होता. उथप्पाच्या (42) झंझावातापाठोपाठ सामनावीर उमेश यादवने (3/13) केलेल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर कोलकात्याने सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याने 8 बाद 163 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबला आठ गड्यांच्या मोबदल्यात 135 धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून वृद्धिमान साहाने सर्वाधिक 35 धावांची केलेली खेळी व्यर्थ ठरली. तसेच मनन वोहरा 26 आणि कर्णधार जॉर्ज बेली 26 धावा काढू शकले. याही सामन्यात ग्लेन मॅक्सवेल सपशेल अपयशी ठरले. त्याला 6 धावांची खेळी करता आली. झंझावाती फलंदाज डेव्हिड मिलरदेखील आठ धावा काढून तंबूत परतला. सलामीवीर वीरेंद्र सेहगावने दोन धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक : कोलकाता नाइट रायडर्स : 8 बाद 163 धावा, किंग्ज इलेव्हन पंजाब : 8 बाद 135 धावा.
उथप्पाने सावरले
कोलकाता संघाची निराशाजनक सुरुवात झाली. गौतम गंभीर (1) स्वस्तात बाद झाला. या वेळी सलामीवीर रॉबिन उथप्पाने संघाचा डाव सावरला. त्याने मनीष पांडेसोबत धावसंख्येला गती दिली. दरम्यान, उथप्पाने 30 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या साह्याने सर्वाधिक 42 धावा काढल्या. दरम्यान, अक्षर पटेलने उथप्पाला झेलबाद केले. त्यापाठोपाठ पटेलने पांडेलाही (21) बाद केले. युसूफ 20, शाकीबने 18 धावांचे योगदान दिले. करणवीरने 40 धावा देत तीन गडी बाद केले.
यादवची धारदार गोलंदाजी
कोलकात्याकडून उमेश यादवने चार षटकांत 13 धावा देत तीन गडी बाद केले. त्याने पंजाबच्या वीरेंद्र सेहवाग, ग्लेन मॅक्सवेल आणि जॉर्ज बेली या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्न मोर्कलने 23 धावा देत दोन गडी बाद केले. शाकीब आणि पीयूष चावलाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

विराट कोहलीचा विक्रम ब्रेक
कोलकात्याच्या रॉबिन उथप्पा उथप्पाने बुधवारी विराट कोहलीचा आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक 634 धावांचा विक्रम मोडला. त्याने क्वालिफायरच्या सामन्यात पंजाबविरुद्ध 42 धावांची खेळी केली. यासह त्याने विक्रमी 655 धावांचा पल्ला 15 सामन्यांत यशस्वीपणे गाठला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, क्वालिफायर सामन्याची आणखी छायाचित्रे...