आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओत सिंधूला हरवणारी मारिन हैदराबादमध्ये दिसली या अंदाजात, केला रॅम्प वॉक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरीन सिंधूसमवेत रॅम्प वॉक करताना. मारिन भारतीय पोशाखात दिसली. - Divya Marathi
वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरीन सिंधूसमवेत रॅम्प वॉक करताना. मारिन भारतीय पोशाखात दिसली.
हैदराबाद- प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील दुस-या सीजनची सुरुवात रविवारी हैदराबादमध्ये झाली. त्याआधी शानदार ओपनिंग सेरेमनी झाला त्यावेळी खेळाडू डिफरंट लूकमध्ये दिसले. शनिवारी झालेल्या एका इव्हेंटमध्ये खेळाडूंनी पारंपारिक भारतीय आऊटफिटमध्ये रॅम्प वॉक केला. तेथे सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन राहिली ती रिओत बॅडमिंटनमध्ये गोल्ड जिंकणारी कॅरोलिना मारिन. मारिनने सुद्धा भारतीय लेहंग्यात रॅम्प वॉक केला. ती रॅम्पवर पीव्ही सिंधू समवेत दिसली. पहिल्या मॅचमध्ये मारिन भारी पडली सिंधूवर....
 
- वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरीनने आपले वर्चस्व अबाधित ठेवताना पुन्हा भारताच्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का दिला.
- स्पेनच्या मरीनने सामन्यात सरस खेळी करताना ११-८, १२-१४, ११-२ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. 
- सिंधूची रिओप्रमाणेच येथेही झुंज व्यर्थ ठरली. तिने दुसऱ्या गेममध्ये बाजी मारून लढतीत बरोबरी साधली होती. 
- मात्र, त्यानंतर ती तिसऱ्या निर्णायक गेममध्ये सपशेल अपयशी ठरली. याचा फायदा घेत मरीनने गेम जिंकून सामना नावे केला. या
- पूर्वी मरिनने रिओच्या फायनलमध्ये सिंधूवर मात केली होती. त्यानंतर सिंधूने दुबईत मरिनला हरवले होते. 
 
मारिनची टीम हैदराबादची विजयी सलामी-
 
- कॅरोलिना मरीनने आपले वर्चस्व अबाधित ठेवताना पुन्हा भारताच्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का दिला. तिने दुसऱ्या सत्राच्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये शानदार विजय मिळवला. 
- याच्या बळावर यजमान हैदराबाद हंटर्सने लीगमध्ये विजयी सलामी दिली. यजमानांनी सलामीला सिंधूच्या चेन्नई स्मॅशर्सवर ४-३ ने मात केली. 
- यातून हैदराबाद टीमला लीगमधील आपल्या किताबाच्या मोहिमेला दमदार सुरुवात करता आली. आता हैदराबादला सोमवारी लीगमध्ये अवध वॉरियर्सविरुद्ध खेळावे लागणार आहे. 
- या सामन्यात बाजी मारून दुसऱ्या विजयासाठी हैदराबाद उत्सुक आहे. 
 
सिंधू-मारिनचा एकत्र रॅम्प वॉक-
 
- खेळात दोघी एकमेंकाविरूद्ध भिडल्या असल्या तरी कोर्टबाहेर त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत.
- या इव्हेंटचा ओपनिंग सेरेमनीत कॅरोलिना मारिन आणि पी व्ही सिंधू यांनी एकत्र रॅम्प वॉक केला.
- तसेच सिंधूने आपले प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्यासह रॅम्प वॉक केला. यावेळी देशी व विदेशी खेळाडूही भारतीय पारंपारिक लूकमध्ये दिसले.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मारिन, सिंधूचे रॅम्प वॉक व ओपनिंग सेरेमनीतील इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...