आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PV Sindhu Jumps To 9th Position In International Badminton Ranking

बॅडमिंटन : क्रमवारीत सिंधू नवव्या स्थानी; सायना आठव्या स्थानी, सौरभ वर्माची प्रगती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी धडक मारली. तिने लंडन ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालच्या तुलनेत क्रमवारीतील बरेच अंतर कमी केले. भारताची ‘फुलराणी’ सायना क्रमवारीत आठव्या स्थानी आहे. सिंधूने 55752 गुणांसह क्रमवारीत नववे स्थान गाठले.
सायना आणि सिंधू आगामी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहेत. येत्या 4 मार्चला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पुरुष गटात सौरभ वर्माने क्रमवारीत नऊ स्थानांनी सुधारणा केली. यासह त्याने 41 वे स्थान गाठले. तसेच पी. कश्यप 18 व्या स्थानी कायम आहे.