आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Qatur Open Tenins Competation : Wonjiyaki,ivonovick Victory

कतार ओपन टेनिस स्पर्धा : वोन्जियाकी, इव्हानोविकची विजय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा - डेन्मार्कची अव्वल टेनिसपटू कॅरोलीन वोन्जियाकी व सर्बियाची अ‍ॅना इव्हानोविकने कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला.

वोन्जियाकीने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मार्वेना जुगीसचा पराभव केला. तिने ही लढत 6-1, 6-2 अशा फरकाने जिंकली. अ‍ॅना इव्हानोविकने पहिल्या फेरीत ऑ स्ट्रियाच्या तमिरा पास्झेकला पराभूत केले. सर्बियाच्या टेनिसपटूने या लढतीत 6-1, 6-2ने विजय मिळवला. इव्हानोविकने दमदार सुरुवात करत दोन्ही सेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला.

दुसरीकडे रशियाच्या स्वेतलाना कुज्नत्सोवाने अमेरिकेच्या बाथेन माटेक सॅन्डला 7-6, 6-4 ने हरवले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही अव्वल टेनिपटूंमध्ये रोमांचक लढत झाली. अखेर, ट्रॉयब्रेकरपर्यंत रंगलेला पहिला सेट स्वेतलानाने जिंकून लढतीत आघाडी मिळवली.दुस-यासेटमध्ये अमेरिकेच्या खेळाडूने निराशाजनक खेळी केली.
याचा फायदा घेत रशियाच्या टेनिसपटूने दुस-यासेटमध्ये बाजी मारली. या विजयासह तिने दुस-याफेरीत प्रवेश केला.