आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल-7 मध्ये आज डबल धमाका, क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांची रंगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता/मुंबई - आईपीएल-7 मध्ये आज डबल धमाका होणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) समोरा-समोर असतील. तर दुस-या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सबरोबर होत आहे. या सामन्यात पुराभूत होणा-या संघाचा आयपीएलमधील प्रवास याच ठिकाणी थांबणार आहे. तर विजेत्या संघाचा सामना दुस-या क्वालिफरायरमध्ये केकेआर-पंजाब यांच्यातील पराभूत संघाबरोबर होणार आहे.

पंजाब-केकेआर यांच्यातील हा सामना मंगळवारीच होणार होता. मात्र पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता. आता आज दुपारी चार वाजता हा सामना होणार आहे. दिवसाचा दुसरा सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात रात्री आठ वाजता मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईने कर्णधार धोनीच्या नेतृत्वात संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.
तर रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणा-या मुंबई इंडियन्सला मोठ्या प्रमाणावर यश अपयशांचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीचे पाच सामने गमावल्याने मुंबई स्पर्धबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, जोरदार पुनरागमन करत संघाने क्वालिफायरपर्यंत मजल मारली. 14 सामन्यांमध्ये नऊ सामने जिंकत चेन्नई तिस-या स्थानावर आहे. तर सात सामने जिंकून मुंबई चौथ्या स्थानी आहे.
मुंबईला घरच्या मैदानाचा फायदा
मुंबईच्या टीमसाठी आनंदाची बातमी म्हणजे घरच्या मैदानावर सामना होणार आहे. करा किंवा मरा अशीच परिस्थिती असणार असल्याने मुंबईच्या संघाला चाहत्यांच्या प्रतिसादाचा फायदा मिळू शकतो. टीम सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यात गेलेला सामना खेचून आणण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी गेल्या काही सामन्यांत दाखवून दिले आहे.
चेन्नईचा संघ अत्यंत संतुलित
चेन्नईचे आव्हान मुंबईसाठी तेवढे सोपे असणार नाही. चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. चांगले फलंदाज आणि तेवढेच उत्कृष्ट गोलंदाज यांचे संतुलन त्यांच्या संघात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धोनी नेतृत्व करत आहे. फलंदाती आणि नेतृत्व दोन्हीच्या माध्यमातून होत्याचे नव्हते करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. यंदा मात्र त्याचा आक्रमकपणा जाणवलेला नाही.
दोन्ही टीममधील प्रमुख खेळाडू
मुंबई इंडियन्स : लेंडल सिमन्स, माइक हसी, रोहित शर्मा, कोरी अँडरसन, कॅरोन पोलार्ड
चेन्नई सुपरकिंग्स : ड्वेन स्मिथ, सुरेश रैना, ब्रँडन मैक्क्युलम, धोनी, आर अश्विन