Home »Sports »Other Sports» Quater Open Tenis : Ajarenka,Randawaska Third Round

कतार ओपन टेनिस : अजारेंका, रंदावांस्का तिस-या फेरीत

वृत्तसंस्था | Feb 15, 2013, 01:00 AM IST

  • कतार ओपन टेनिस : अजारेंका, रंदावांस्का तिस-या  फेरीत

दोहा - अव्वल मानांकित बेलारूसची व्हिक्टोरिया अजारेंकाने स्वित्झर्लंडच्या रोमिना अपरेंडीला पराभूत करून कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश मिळवला आहे. अजारेंकाने रोमिनाला दुस-या फेरीत संधी न देता सरळ सेटमध्ये 6-2, 6-3 ने विजय मिळवत पुढच्या फेरीत स्थान मिळवले. इतर एका लढतीत चौथी मानांकित पोलंडच्या एग्निजस्का रंदावांस्काने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅनास्तासिया रोदियोनोवा हिला 6-3, 6-2 ने नमवले.
स्पर्धेतील इतर लढतीत सहावी मानांकित इटलीच्या सारा इराणीने हंगेरीच्या तामिया बाबोसला 6-4, 6-0 ने मात दिली. दोन वेळा ग्रँडस्लॅम विजेता रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सेवाने नववी मानांकित फ्रान्सच्या मारियन बार्टोलीला 6-4, 6-4 ने हरवले.

Next Article

Recommended