आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुरली विजय संघात, मग वासिम जाफरला वेगळा न्‍याय का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्‍या महिन्‍यात ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध सुरू होणा-या कसोटी मालिकेतील पहिल्‍या दोन कसोटीसाठी टीम इंडियाची रविवारी घोषणा करण्‍यात आली. संदीप पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखालील निवड समितीने एकच मोठा निर्णय घेतला. तो म्‍हणजे गौतम गंभीरला कसोटी संघातून बाहेर करणे. गेल्‍या तीन वर्षांत गंभीरला एकही कसोटी शतक करता आलेले नाही. या कालावधीत त्‍याची सरासरी 30 पेक्षाही कमी आहे. आणि त्‍याची हीच कामगिरी त्‍याला संघातून स्‍थान गमावण्‍यास कारणीभूत ठरली. मात्र, निवड समितीला गौतम गंभीरचे महत्‍व माहीत होते. त्‍यामुळेच तो टीममध्‍ये अद्याप खेळत होता. दिल्‍लीच्‍या या क्रिकेटपटूची बीसीसीआयवर चांगलीच पकड असल्‍याचे बोलले जात होते. त्‍याला टीम इंडियाचा भविष्‍यातील कर्णधारही संबोधले जात होते. त्‍यामुळे त्‍याला संघाबाहेर काढण्‍याचा निर्णय निवड समितीने खूप विचारपूर्वक घेतला असेल.

त्‍यामुळेच दिल्‍लीच्‍याच शिखर धवनने गंभीरची जागा घेतली. आता आपली जागा मिळवण्‍यासाठी त्‍याला पुन्‍हा जोरदार फलंदाजी करावी लागेल. परंतु, संदीप पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखालील टीमने एका चांगल्‍या निर्णयाबरोबर अनेक वादग्रस्‍त निर्णय घेतले आहेत. सध्‍या याचीच मोठया प्रमाणात चर्चा सुरू आहे. अधिक जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...