Home »Sports »Other Sports» Questions On Team India For England ODI

धोनीमुळेच वीरेंद्र सेहवाग संघाबाहेर?; बिशनसिंग बेदींकडून प्रश्नचिन्ह!

दिव्य मराठी वेब टीम | Jan 07, 2013, 13:41 PM IST

नवी दिल्‍ली- इंग्‍लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन वन डे सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघावरुन राजकारण झाले आहे. खराब कामगिरीमुळे भारताचा सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला पहिल्या तीन वन डे साठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. असे असले तरी मागील काही काळापासून सतत अपयशी ठरत असलेला सलामीचा फलंदाज गौतम गंभीर आणि मधल्या फळीतील रोहित शर्मा यांना संघात स्थान देण्यात आले आहे. त्यावरुन येत्या काही दिवसात चांगलीच चर्चा रंगणार आहे. तसेच गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यावरही प्रचंड दबाव असून, पहिल्या तीन सामन्यात त्यांनी कामगिरी सुधारली नाही तर संघातून त्यांनाही डच्चू मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे असले तरी सेहवागला संघातून बाहेर काढण्यास त्याची खराब कामगिरी जरी कारणीभूत असली तरी, कर्णधार धोनीशी त्याचा असलेला वाद हेच कारण असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्याचे एकदिवसीय सामन्यातील करिअर संपल्यातच जमा असल्याचे बोलले जात आहे.

का चालते धोनीची मक्तेदारी, वाचण्यासाठी पुढे क्लिक करा....

Next Article

Recommended