आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Quinton De Kock 5th In ODI To Scored 3 Successive Hundred

टीम धोनीला घाम फोडणारा 20 वर्षांचा युवा खेळाडू ठरला वर्ल्ड No.1

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण अफ्रिका आणि टीम इंडिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोणता खेळाडू सरस ठरणार याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. सर्वांच्या नजरा भारतीय संघातील त्रिमूर्तींवर, अर्थात शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर खिळल्या होत्या. मात्र मालिकेचा हिरो ठरला डी. कॉक.
केवळ 20 वर्षांच्या डी. कॉकसमोर भारतीय गोलंदाज पाणी भरताना दिसले, तर भारतीय संघातील दिग्गजांना एक धाव देखील मोठ्या कष्टाने मिळत होती. त्याचवेळी या युवा खेळाडूने तिन्ही सामन्यात शतक ठोकून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले.
या फलंदाजीच्या जोरावर डी. कॉक एका स्पेशल क्लबमध्ये दाखल झालेला जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. याशिवाय त्याच्या या कामगिरीने तो एका बाबतीत जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.
पुढल स्लाइडमध्ये, डी. कॉक सारखे आणखी कोणी धुतले भारताला..