आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनची खेळी आजही स्मरणात, क्युरेटर चंद्रशेखर यांनी दिला स्मृतींना उजाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - बिर्याणीखालोखाल हैदराबादच्या क्रिकेटप्रेमींना आजही दरवळ मनात ठेवून गेलेली खेळी म्हणजे सचिन तेंडुलकरची पाच वर्षांपूर्वीची १७५ धावांची खेळी. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत त्याने केलेल्या अफलातून खेळीची आठवण आजही हैदराबादी क्रिकेटप्रेमी काढतात.
येथील मुख्य क्युरेटर वाय. एल. चंद्रशेखर यांना नुकताच चांगले पिच तयार केल्याबद्दल पुरस्कार देण्यात अाला त्यानिमित्ताने त्यांनीदेखील ही आठवण काढली. रविवारच्या सामन्यात माहेलानेदेखील आकर्षक शतकी खेळी केली, तीदेखील सचिनच्या खेळीप्रमाणेच अपयशी ठरले, त्यानंतर बोलताना चंद्रशेखर यांनी सचिनच्या त्या खेळीची वैशिष्ट्ये सांगितली.

भारतीय संघाला विजयासाठी दुस-या डावात ३५१ धावांची गरज होती. समोर बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचे बेन हल्फेनहॉस, डग बॉलिंगर, क्लींट मॅके आणि शेन वॅटसन असे एकाहून एक सरस आणि दिग्गज गोलंदाज होते. त्यांच्यासमोर एका बाजूने भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिनने तुफानी १७५ धावांची खेळी केली. त्या वेळी दुस-या बाजूने केवळ सुरेश रैनाने एकाकी झुंज देताना एकट्याने ५९ धावा करीत चांगली साथ दिली, तर संघातील अन्य एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या उभारू शकला नसल्याने भारताने हा सामना ३ धावांनी गमावला. मात्र सचिनच्या त्या अजरामर खेळीने हैदराबादवासीयांच्या मनात कायमस्वरूपी घर केले आहे.