आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Quto Challenger News In Marathi, Purava Raja, Divya Marathi

क्योटो चॅलेंजर :दिविज-राजाला किताबाची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्योटो - भारताचा युवा खेळाडू दिविज शरण आणि पुरव राजा सत्रातील पहिल्या किताबापासून अवघ्या एका पावलावर आहेत. या अव्वल मानांकित जोडीने शुक्रवारी क्योटो चॅलेंजर टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
जपानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताच्या जोडीने शानदार विजय मिळवला. दिविज-राजाने पुरुष दुहेरीच्या उपांत्य लढतीत जपानचा तोशिहिदे आणि थायलंडचा दनाई उडोमचोकेला सरळ सेटमध्ये पराभूत केले. या जोडीने 7-6, 7-5 अशा फरकाने उपांत्य सामना जिंकला.
तब्बल अडीच तास रंगलेल्या लढतीत अव्वल मानांकित जोडीने शानदार विजय मिळवला. तोशिहिदे आणि दनाईने अव्वल मानांकित जोडीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रायब्रेकरपर्यंत रंगलेले दोन्ही सेट भारताच्या युवा खेळाडूंनी आपल्या नावे केले. यासाठी या जोडीला 150 मिनिटे शर्थीची झुंज द्यावी लागली.
आता अव्वल मानांकित दिविज आणि राजासमोर फायनलमध्ये सांची रातीवताना आणि मिचेल व्हीनसचे आव्हान असेल. या दुस-या मानांकित जोडीने उपांत्य सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. या जोडीने तिस-या मानांकित हैस यिन पेंग आणि त्सुंग हुआ यांगवर 6-0, 6-2 ने मात केली. दुस-या मानांकित जोडीने अवघ्या 41 मिनिटांत पुरुष दुहेरीच्या उपांत्य लढतीत विजय मिळवला.
या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी दिविज आणि पुरव जोडीला प्रबळ दावेदार मानल्या जात आहे. तसेच सत्रातील पहिल्या किताबासाठी ही जोडी अंतिम सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शक्यता आहे