आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rafael Nadal Beats Roger Federer 6 4, 6 2 At Indian Wells

इंडियाना वेल्स : फेडररविरुद्ध नदालचा सहज विजय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियाना वेल्स - स्पेनचा खेळाडू राफेल नदालने शुक्रवारी एकतर्फी लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी रॉजर फेडररला पराभूत केले. या लढतीतील विजयासह त्याने इंडियाना वेल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पेनच्या खेळाडूने ही उपांत्यपूर्व लढत 6-4, 6-2 अशा फरकाने जिंकली. नदाल व फेडरर यांच्यात ही टेनिसमधील 29 वी लढत झाली. नदाल यामध्ये 19-10 ने आघाडीवर आहे. चार वेळचा चॅम्पियन व दुसर्‍या मानांकित फेडररने पहिला ब्रेक पाइंट वाचवला. मात्र, पुढच्या गेममध्ये नदालने त्याची सर्व्हिस ब्रेक करून 4-3 ने आघाडी मिळवली. पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या फेडररने दुसर्‍या सेटमध्ये नदालची सर्व्हिस ब्रेक केली. दरम्यान, झालेल्या चुकांचा त्याला मोठा फटका बसला. यामुळे त्याने नदालसमोर सलग दोन सेटमध्ये शरणागती पत्करली.

नदाल व फेडरर एक वर्षानंतर समोरासमोर आले होते. दोन्ही टेनिस महारथींमध्ये गत वर्षी याच स्पर्धेत सामना झाला होता. या लढतीत फेडररने सलग सेटमध्ये विजय मिळवला होता. नदालने या वेळी फेडररचे आव्हान एक तास 24 मिनिटांमध्ये मोडून काढले. दोन वेळचा विजेता नदालची सेमीफायनलमध्ये सहाव्या मानांकित बर्डिकशी गाठ पडेल. चेक गणराज्याच्या टॉमसने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अंडरसनला 6-4, 6-5 ने पराभूत केले.