लंडन - भारताचा स्टार खेळाडू
रोहन बोपन्नाने बुधवारी आपली सहकारी आंद्रे हल्वाकोवासोबत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. दुसरीकडे
मारिया शारापोवा आणि
राफेल नदालचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाच्या एन. क्यागिओसने जगातील नंबर वन राफेल नदालचा पराभव केला. बिगरमानांकित क्यागिओसने 7-6, 5-7, 7-6, 6-3 अशा फरकाने सामना जिंकून नदालला बाहेरचा रस्ता दाखवला.
रोहन बोपन्ना आणि आंद्रेने मिर्श दुहेरीच्या दुसर्या फेरीत सी. फ्लेमिंग आणि जे. राईला रंगतदार लढतीत सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. या सातव्या मानांकित जोडीने 6-4, 7-5 अशा फरकाने सामना जिंकला. यासह विजेत्या जोडीने पुढच्या फेरीत धडक मारली.
तसेच दुसर्या मानांकित ब्रायन आणि के. पेस्चेकनेही पुढची फेरी गाठली. या जोडीने बिगरमानांकित डी. इग्लोट आणि जे. कोंटाला पराभूत केले. या दुसर्या मानांकित जोडीने 7-6, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला.
अँडी मरे स्पर्धेतून बाहेर
तिसर्या मानांकित अँडी मरेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याला बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 6-1, 7-6, 6-2 ने हरवले.
(फोटो - मारिया शारापोवा)