आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुबई - जगातील नंबर वन राफेल नदाल आगामी आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीगमध्ये (आयटीपीएल) मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. महेश भूपतीने आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेला 28 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होईल. या स्पर्धेसाठी मुंबई टीममध्ये भारताची महिला टेनिसपटू सानियासह रोहन बोपन्नाचाही समावेश करण्यात आला. यासह मुंबई संघात फ्रान्सचा गेल मोफिल्स, माजी नंबर वन टेनिसपटू अँना इव्हानोविकची निवड करण्यात आली. मात्र, या स्पर्धेत भारताचा एकेरीचा नंबर वन सोमदेव देववर्मनला संधी देण्यात आली नाही.
दुसरीकडे जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेला नोवाक योकोविक दुबई संघाकडून खेळणार आहे. या संघात वोज्नियाकी, जांको टिप्सारेविच, नेनाद झिमोनिक, मालेक जाझिरी आणि मार्टिन हिंगीसची निवड करण्यात आली. विम्बल्डन चॅम्पियन आणि लंडन ऑलिम्पिक अँडी मुरे बँकाँक टीमचे प्रतिनिधित्व करेल. तसेच जगातील नंबर वन महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स सिंगापूर टीमचे नेतृत्व करेल.
या स्पर्धेसाठी नुकतीच संघ मालकांची चर्चात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. यात स्पर्धेच्या आयोजनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. येत्या 28 नोव्हेंबरला सिंगापूर येथे स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा समारोप दुबई येथे 14 डिसेंबर रोजी होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.