आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rafael Nadal Plunders Llyeton Hewitt In Second Round Of Sony Open News In Marathi

सोनी ओपन टेनिस स्पर्धा : नदाल तिसर्‍या फेरीत; भूपती बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - जगातील नंबर वन राफेल नदालने सोनी ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत धडक मारली. त्याने जगातील माजी नंबर वन लेटन हेविटचा 6-1, 6-3 ने पराभव केला. आता त्याचा सामना डेनिस इस्तोमिनशी होईल.

लिएंडर पेसकडून निराशा : भारताच्या लिएंडर पेसचे पुरुष स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पेस आणि दक्षिण आफ्रिकेचा केविन अ‍ॅँडरसनला या जोडीला दुसर्‍या मानांकित अलेक्झांडर पेया आणि बु्रनो सोअरेसने 6-4, 6-4 ने पराभूत केले.

सेरेना, शारापोवा चौथ्या फेरीत : सेरेना विल्यम्स व मारिया शारापोवाने चौथी फेरी गाठली. सेरेनाने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाला 6-4, 4-6, 6-4 ने पराभूत केले. गत उपविजेत्या शारापोवाने चेक गणराज्यच्या लुसी सफरोवावर 6-4, 6-7, 6-2 अशा फरकाने मात केली.