आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rafael Nadal Recovers In Time To Win Rio Open News In Marathi

राफेल नदालने जिंकले रिओ ओपनचे विजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिओ दी जानेरिओ - जगातील नंबर वन राफेल नदालने यंत्राच्या सत्रात पहिल्या किताबावर नाव कोरले. त्याने रिओ ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. स्पेनच्या नदालने अंतिम सामन्यात युक्रेनच्या अलेक्सांद्र डोल्गोपोलोवचा पराभव केला. त्याने 6-3, 7-6 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. याशिवाय स्पेनच्या खेळाडूने करिअरमधील 43 वे क्ले कोर्टचे अजिंक्यपद जिकंले. युक्रेनच्या खेळाडूने दुसर्‍या सेटमध्ये नदालला चांगलेच झुंजवले. त्याने हा सेट ट्रायब्रेकरपर्यंत खेचला. मात्र, नंबर वन खेळाडूने आक्रमक सर्व्हिस करून दुसरा सेट आपल्या नावे केला.

या वेळी 13 वेळचा ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने दुखापतीतून सावरल्यानंतर यंदा प्रथमच किताब पटकावला. गत महिन्यात त्याला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते.

नाराने जिंकला पहिला किताब
जपानची युवा खेळाडू कुरुमी नाराने करिअरमध्ये डब्ल्यूटीएचा पहिला किताब पटकावला. तिने महिला एकेरीचा अंतिम सामना जिंकला. जपानच्या खेळाडूने फायनलमध्ये कार्ला झाकोपाल्पोववर मात केली. तिने 6-1, 4-6, 6-1 न विजय मिळवला. यासह जपानच्या खेळाडूने विजेतेपदावर नाव कोरले. कार्लाने आतापर्यंत करिअरमध्ये दोन डब्ल्यूटीए किताब जिंकले आहेत.

सिलीच मरिनला डेलरीचे अजिंक्यपद
क्रोएशियाच्या मरिन सिलीचने डेलरी बीच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम सामन्यात केव्हिन अँडरसनचा पराभव केला. त्याने लढतीत 7-6, 6-7, 6-4 ने विजय मिळवला. महिनाभरात सिलीचने तिसर्‍यांदा फायनलमध्ये धडक मारली होती. त्याला दोन स्पर्धांच्या अंतिम सामन्यात विजयश्री मिळवता आली.